कालचे युतीचे दृश्य बहुतेकांनी पाहिले असेलच. आजच्या बहुतेक सर्व वर्तमानपत्रांत छायाचित्रेही आली आहेत. पण ही छायाचित्रे प्रत्यक्ष दर्शनाच्या अनुभवाची बरोबरी करू शकत नाहीत.

चंद्र २४ तासात साधारणपणे १२. ५ अंशातून पुढे सरकतो. काल चीन मधून पाहिले असता चंद्र हा गुरू - शुक्राच्या बराच खाली दिसला असता तर लंडनमधून पाहता तो गुरू-शुक्राला ओलांडून वरच्या बाजूस आलेला दिसला असता. याचा अर्थ हे दृश्य भारतीय उपखंडातूनच सर्वोत्तम दिसू शकले. न्यूयॉर्क मधून पाहता हा हसरा चेहरा न दिसता  काहीसे 'भाळी चंद्र असे धरिला' अशा प्रकारचे दृश्य दिसले असावे कारण अमेरिकेची स्थानिक वेळ  भारताच्या १०/१२ तास मागे असल्याने तोपर्यंत चंद्र ६ अंश पुढे गेला होता. काही युरोपियन देशातून चंद्राची शुक्रासोबत पिधान युतीही दिसली असेल.

साधना म्हणतात तसे काल क्षितीजावर दिसणारा चंद्र अधिक पिवळा व नंतर लाल दिसू लागला होता.

आज चंद्र १२. ५ अंश पुढे गेल्याने भारतामधून आजचे दृश्य घड्याळात ४ वाजल्यासारखे दिसेल.

निरीक्षणे नोंदवल्याबद्दल मनोगतींचे आभार!