पाटील , पवार , देशमुख यांची हिंदीत बोलण्यासाठीची तडफड बघितली की किव वाटते त्यांची आणि राज्याची देखिल की जिथे मुख्यमंत्र्याना देखिल मराठीत बोलायची लाज वाटते.. मराठीत एखादी पत्रकार परिषद सुरू केली तरी उत्तरेतल्या वाहिन्यांवाले हिंदी हिंदी म्हणून  बोलू देत नाहीत. जे स्वःताच्या भाषेबद्दल ईतके बेफिकिर असतील त्यांच्या  कडून राज्याच्या रक्षणाची अपेक्षा करणे चुकिचे आहे. अश्याच एका दुर्दैवी घटनेच्या वेळेला बंगलोर च्या आयुक्तांनी कानडीतून माहिती दिली आणि ती सर्वांनी आपापल्या भाषातून दाखविली.