भारताची आजपर्यंतची (स्वातंत्र्यानंतरची) युद्ध पाहिल्यास सर्व युद्ध आपल्यावर लादली होती.
आपण कधीही कोणावरही स्वतः हल्ला केला नाही.
खरे आहे.
त्यामुळे तुमच्या पाहिल्या नियमाप्रमाणे जर "आपल्या सोयीच्या वेळेला (सोयीच्या ऋतूत) सोयीच्या
जागी " याची वाट बघत बसलो असतो तर भारत कधीच पुन्हा एकदा पारतंत्र्यात गेला असता.
माझ्या लेखाचे शीर्षकच युद्ध कधी सुरू करायचे असे आहे. युद्धाला तोंड कधी द्यायचे... असे नाही. वैरी
चालून आल्यावर तोडीस तोड उत्तर तर आपण देतच आलेलो आहोत.
पाकिस्तान विरुद्ध युद्ध करण्याची ही वेळ नक्कीच नाही आहे पण तुमच्या लेखातले युद्ध न करण्याची
कारणे खुपच प्राचीन आणि असंबंध वाटतात.
कारणे प्राचीन असू शकतात. ह्यात संशय नाही पण जेव्हा दहशतवाद्यांसारखा तयारीत असलेला वैरी आपल्या
समोर असतो, आपल्याकडील सुरक्षा व्यवस्थेजवळ साधनसामुग्री तुटपुंजी असते, आपली सेना / कमांडो
देशांतर्गत एखाद्या स्थळी प्रत्येक क्षण मोलाचा असताना विमान न मिळाल्यामुळे उशीरा पोहोचतात, आपले
कायदे सक्षम नसतात त्यावेळी इतिहासापासून आपण काहीतरी शिकलेच पाहिजे.
ह्याचा अर्थ पूर्वी जसे शिवाजी महाराज वागले तसेच वागले पाहिजे असे नाही मात्र त्यांच्या सारखेच भावनेच्या
आहारी न जाता शांतपणे आपली तयारी करणे चालूच ठेऊन, आपले गुप्तहेर खाते सक्षम करून योग्य
वेळी आणि योग्य ठिकाणी पाकिस्तानच्या मर्मावर घाव घालायला काहीच हरकत नाही. असो.
आपण जर क्रमश: ह्या शब्दाची नोंद घेतली असतीत तर आनंद झाला असता. कारण पुढे इतर सुद्धा काही मुद्दे
ह्या अनुषंगाने येतीलच.