लेख त्यात आवश्यक असणारे मुद्दे अपुरे ठेवतो. शीर्षक वाचू अपेक्षा वाढतात. पण हे युद्ध पुढची पाच वर्षे का करू नये असा दावा करणारी लेखिका( की लेखक? ) ते तसे का हे कुठे सांगत नाही. त्याएवजी शिवाजी- अफजलचे पुस्तकी दाखले आणि उतारे उद्धृत केले गेले आहेत.

युद्ध आता तातडीने करू नये? की हिवाळा होइपर्यंत थांबावे? की पर्यायी सागरी मार्गाचा वापर करावा? अश्या प्रश्नाचा उहापोह लेखात असेल असे वाटते, तसे करण्याचा मानस दिसतो कारण..

<<अजून किमान ५ वर्षे तरी नाही. का ते आपण सविस्तर पाहू -

१) युद्ध शास्त्राचा पहिला नियम आहे की युद्ध हे नेहमी आपल्या सोयीच्या ....>>> ह्यापुढे आता अजून काही मुद्दे येणार असे वाटते , पण तसे काही न होता शिवाजी- अफजलचे पुस्तकी दाखले आणि उतारे , पुस्तकाच्या पान क्र, सह देत लेख संपतो.