फक्त युद्ध करायचे आहे म्हणून (निदान आजकाल तरी) कोणीही ते करत नाही. अफजलखानाच्या सैन्याबरोबर युद्ध कशासाठी करायचे याची कारणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातदेखील स्पष्ट होती. आजच्या जगात तर ती कारणे जगाला सांगावी लागतात आणि पटवून द्यावी लागतात.