आपण इथून पाकिस्तान सीमेवर हल्ला केला आणि तिथून त्यांनी / दहशतवाद्यांनी गेल्या आठवड्यात 
जसे १० अतिरेकी पाठवले तसे शस्त्रसज्ज आणि अति-प्रशिक्षित अतिरेकी भारतात १० मोठ्या शहरात 
पाठवले तर आपली काय स्थिती होईल? ओबामाचे कमांडो यायला पण निदान ६ तास जातील. आपल्या 
तयारी विषयी तर फारसे न बोललेलेच बरे.  

तसेच आता समोरासमोर युद्ध करायचे दिवस संपले.  छुपे युद्ध हाच नव्या युगाचा मूलमंत्र होणार आहे.  
एक मात्र खरे की अमेरिकेचा पाठिंबा असेल तर आपण पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तान मधील अतिरेकी 
तळांवर विमानांनी हल्ले करू शकतो.