मला वाटते मराठी माणसाला हिंदी सुधारण्याची तेवढी गरज नाही. आपण कमीतकमी हिंदी बोलू तर शकतो (शरम न वाटता, माझ्या अनेक दक्षिण भारतीय मित्राना थोडेफार  हिंदी येते, हे मला बऱ्याच दिवसांनी समजले.)

महाराष्ट्र हे असे राज्य आहे (हिंदी मातृभाषा नसलेले. ) जिथे जास्तीत जास्त लोक हिंदी बोलू अथवा समजू शकतात. आणि याचमुळे भारतातील कोणतीहि हिंदी भाषिक व्यक्ती महाराष्ट्रात आरामात राहू शकते. मला वाटते की , मराठी माणसाला हिंदी पेक्षा जास्त इंग्रजी भाषेची गरज आहे.

महारष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी स्वतः कबुल केले कि त्यांना इंग्रजी येत नाही, आणि दिल्लीला गेल्यावर  त्यांची फार गोची होते. :) पाहा शिक्षण मंत्र्याची हि आवस्था , बाकीच्यांचा विचार पण नको.

बाकी माझे मराठी लिखान अशुद्ध आहे , ते मला आधी सुधारावे लागेल  .