काल गेट वे जवळ झालेल्या निदर्शनाची छायाचित्रे ई-मेल द्वारे सगळीकडे वितरीत होताहेत. तिथे एकजण Raj Thakare Missing. चा बोर्ड घेऊन उभा पाहिला. त्या तीन-चार दिवसाच्या गदारोळात मनसे ने सुद्धा रक्तदान करुन किंवा रुग्णवाहिका पुरवून थोडीफार मदत केल्याचे ही वाचले होते. मग अशा वेळी राज ठाकरेंकडून अजून काय अपेक्षित असावे?(एन एस जी कमांडोसोबत बंदुक धरून आघाडीवर राहावे काय?) या हल्ल्यानंतर राज ठाकरेंकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया कुठेही आलेली नाही असा एकंदरीत सुर बऱ्याच विंग्रजी वृत्तपत्रांचा दिसतो आहे. एक मात्र खरे की या निमित्ताने सुद्धा मनसे वर हल्ला करायचे कुणी सोडत नाही.