आर आर पाटील ह्यांनी हिंदी कच्चे असल्याने चुकीचे शब्द वापरले असे मला नाही वाटत. त्यांच्या बोलण्याचा आशय मराठीत कसा होता ते नाहीच कळले मग कसे काय ठरवणार की चुकीच्या हिंदीमुळे ते झाले. दुसऱ्या दिवशीही लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी ह्यांनी राजीनामे दिले नव्हते, मी का देऊ? ह्यात ही हिंदी आणि मराठी ने जास्त फरक पडत नाही.
दहावीपर्यंत हिंदी
पूर्ण महाराष्ट्रभर अनिवार्य असूनही किंवा गांधी वगैरे अनेक नेते बराच
काळपर्यंत महाराष्ट्रात राहूनही मराठी माणसाला हिंदी परकी का वाटते?
एका ठिकाणी आपण सर्वजण चर्चा करतो की मराठी लोक एकमेकांशी किंवा इतरांशी मराठीत न बोलता हिंदीत का बोलतो आणि इथे नेमका त्याच्या उलट विषय चालू आहे की हिंदी नीट का येत नाही?
मराठी माणसाचे हिंदी हा ही एक वेगळ्या लेखाचा विषय होता आधी.
असो, सध्या तरी माझे मतप्रदर्शन नाही. चालू द्या