घडलं ते सगळं भयंकर आहे. पण तुम्ही लिहिल्याप्रमाणे खरंच यातून सरकारने धडा घेतला तर या घटनेत मरण पावलेला सामान्य माणूसही शहीद झाल्याचा अभिमान त्याच्या प्रत्येक जवळच्या माणसाला होईल. प्रत्येक मरण पावलेल्या माणसाचा आत्माही सुखावेल. झालेल्या दुर्घटनेत हाच एक सुखाचा धागा असेल असे वाटते.
पण आपण म्हणल्याप्रमाणे हे लिहीताना विनोदाचा विचारही मनाला शिवणार नाही. पण जे लिहीले आहे ते एक विदारक सत्य आहे.
मरण पावलेल्यांच्या आत्म्याला शांती मिळो याबरोबर जिवंत आहेत पण निगरगट्ट आहेत त्या राजकारण्यांना सुबुद्धी मिळो अशीही देवाकडे प्रार्थना..!!!