युद्ध हे शांततेसाठी असते असे म्हणतात. आपल्याला नेस्तनाबूद करणाऱ्या शत्रूला मुळापासून उखडणे योग्य. आता भले युद्धाची ही योग्य वेळ नसेन... ती आणावी लागणार आहे हे ही जाणावे.

              कधी ना कधी या निवडुंगाला उपसावा लागणारच आहे. तो आपला नैतिक अधिकार आहेच.  त्यासाठी अमेरिकेचे ओबामासाहेबाच्या सहीचे प्रशस्तिपत्र कशाला हवे? सुज्ञ वाचक जाणत असावेत की जगात कुठेही युद्ध चालू नसेल तर अमेरिकेत मंदी येते. (कारण त्यांची अर्थव्यवस्था ही युद्धाशी निगडित शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर अवलंबून आहे, आपल्यासारखी शेतीवर नाही. ) त्यात आता जागतिक मंदी आणि ओबामा नवीन नायक बनण्याच्या तयारीत. अशा परिस्थितीत आपल्याला युद्धासाठी प्रोत्साहन देऊन स्वतःची गंगाजळ भरण्याचा त्यांचा अर्थात प्रयत्न असणार.