पहिली महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की मुद्दामच एक असे लेखक निवडलेले आहेत की जे फारसे प्रकाशात 
नाहीत मात्र ज्यांचे साहित्य हे लोक साहित्याचा अनमोल नजराणा आहे.

त्या लेखकाचे नाव आहे श्री. मधुकर रूपराव वाकोडे, जन्म १९४३ - लोकसाहित्याचे व ग्रामीण साहित्याचे संशोधक. अनेक प्रतिष्ठित नियतकालिकांतून त्यांचे विविध विषयांवरील शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत.  

प्रस्तुत व्यक्तिचित्रणपर लेख प्रथम "तरुण भारत,  नागपुर" च्या  १९८१,  दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. तोच लेख 
१९९२ साली आम्हाला युवकभारतीच्या क्रमिक पुस्तकात अभ्यासाला होता.

अप्रकाशित लेखकांचा परिचय घडवून आणण्याच्या माझ्या ह्याच प्रयत्नाचा भाग म्हणून इथेच मनोगतावर मी 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचे 'विष्णुपंत कुलकर्णी' दुवा क्र. १ हे व्यक्तिचित्रण लोकांपुढे आणले 
होते. ज्यायोगे लोकांना अनवट मराठी साहित्यातील माणिकमोत्यांची तोंडओळख होईल.