हॅम्लेटशी संपुर्ण सहमत.

काही दिवसांपुर्वी पर्यंत महाराष्ट्रातील हिंदीभाषकांना मराठी शिकवू असा एक मतप्रवाह होता. मग अचानक अशी गटांगळी का? आणि महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच नेते अपृष्ठवंशीय जमातीतील प्राणीविशेष आहेत. मी आतापर्यंत कुठल्याही इतर राज्यपातळीवरच्या नेत्यांना असे उठसुट दिल्लीला पळताना बघितलेले नाही. त्यामुळे मराठीचे त्यांना काही सोयरसुतक असेल ही अपेक्षाच व्यर्थ आहे.

राहता राहीला मराठी माणसाच्या हिंदी बोलण्याचा प्रश्न. मराठी माणसाला जितके हिंदी येते तेव्हढे पुरेसे आहे. हिंदीभाषकांच्या मोडक्यातोडक्या मराठीचे आपण कौतुक करतोच ना? मग आपण तसेच हिंदी बोललो तर बिघडले कुठे?