नद हा शब्द प्रचंड पात्र (रुंदी) असणाऱ्या (लांबी नाही) नद्यांसाठी वापरला जातो असे ऐकले आहे. मोल्जवर्थमध्ये दिल्याप्रमाणे नद्यांचे पुरुषी स्वरूप दाखवण्याकरता नद हा शब्द वापरला जातो हे देखील पटण्याजोगे आहे. पण नदीचे नाव ब्रह्मपुत्र असून तिला ब्रह्मपुत्रा असे म्हटले जाते असे वाटते. (नद्या या स्त्रिलिंगी असतात असे गणल्याने. चू. भू. दे. घे.)
तसेही, ब्रह्मपुत्रा या शब्दाचा अर्थ नेमका काय? ब्रह्मपुत्र या शब्दाचा अर्थ कळतो पण पुत्रा म्हणजे काय हे माहित नाही. ब्रह्मपुत्र नावाबद्दल अधिक माहिती अर्थातच विकीवर आहे. (मला इथे पेस्ट करता येत नाही.)