अस्मादिकांचे स्थलांतराचे बरेच अनुभव, पण सारे परदेशप्रवासाशी निगडित. त्यात मग नवऱ्याच्या समाधानाचं रूप थोडं बदलतं. सूटकेसवर बसून, तिला पार्श्वभागानं चेपून तिचे खटके लावल्यावर ५०% समाधान दिसतं. उरलेलं ५०% समाधान ती (भलीथोरली, अवजड) बॅग विमान कंपनीच्या 'चेक-इन काउन्टर' वरील महिलेने सुहास्य वदनाने, कुठलीही कुरकुर न करता स्वीकरली की दिसतं.
बाकी लेख सुंदर. 'सेलोटेप-नशीन' फार आवडलं.