अजब,
ही गझल सामयिक आणि वेगळा रदीफ, काफिया  असलेली आहे पण काही तरी खटकते आहे असेहि वाटते. २ रा शेर मतल्याइतका 'पोचत' नाही. (प्रेडीक्टेबल वाटतो)

आवेशाने पेटून उठणे धोक्याचे आहे
शांतपणाने विझून निजणे धोक्याचे आहे...

कुणा म्हणू मी अता आपले अन कोणा परके?
कुणास काही आता म्हणणे धोक्याचे आहे...

--- हे शेर खास जमलेत.

ज्या नेत्यांनी स्वार्थासाठी शहराला विकले
त्या नेत्यांना पुन्हा निवडणे धोक्याचे आहे...

---- हा शेर संदेश दिल्यागत (जजमेंटल) झाला आहे.

तसेच

पराभवांची सवय लागणे धोक्याचे आहे
अशा प्रकारे युद्ध जिंकणे धोक्याचे आहे...

--- या शेरातला अर्थ (मला तरी) नीटसा कळला नाही.

प्रामाणिक मत. राग नसावा.
जयन्ता५२