हिंदी नको आधी मराठी माणसाचे मराठी सुधारायला हवे. जवळपास ८०-८२ राजवाड्यांनी मराठी भाषा 'मुमुर्षु' आहे (मरणाची इच्छा असणारी) असे म्हटले होते. (प्रा. गं. ना. जोगळेकरांच्या शब्दांत ही राजवाड्यांची "भविष्यवाणी की शापवाणी?") त्यांची ही "भविष्यवाणी" किंवा "शापवाणी" खरी ठरवायचीच असे आपण ठरवलेले दिसते.