१००% सहमत! जिथे आपण मराठी माणसे स्वतःचे मराठी सुधारायला तयार नाही तिथे आपल्या हिंदीची कसली काळजी करत बसायची ? मराठीत लिहिताना व बोलताना अक्षम्य चुका करून वर उर्मटपणे "आम्ही असेच बोलणार/लिहिणार, तुम्ही कोण आम्हाला सांगणारे टिकोजीराव लागून गेला आहात? समोरच्याला कळले की झाले. " ही पिंक आपल्याच मायबोलीच्या अंगावर टाकणारे खऱ्या जगात व जालावर (जालावर जरा जास्तच) पावलोपावली भेटतात.
दुसरे म्हणजे वर काही प्रतिसाददात्यांनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नसून राज्यभाषा आहे, म्हणजे केंद्र सरकारच्या कारभाराची अधिकृत भाषा (तिथेही तिच्यावर इंग्रजी मात करतेच!). मग ती सर्व भारतीयांना उत्तम प्रकारे अवगत असलीच पाहिजे हा अट्टहास का? मराठी भाषकांना आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त आणखी एखाद्या भाषेवर प्रभुत्व मिळवायचेच असेल तर इंग्रजीवर मिळवावे, ते जास्त उपयुक्त ठरेल.