खोटे साहेब [ (या दोन शब्दांमधले अंतर लक्षात घेऊ नये! :) ],
'मनोगत'वर मनापासून स्वागत...!
'अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास 'चे दोन्ही भाग वाचले... छान, सुरेख, मस्त. येऊ द्या तिसराही भाग लवकरच.
....................................
यानंतर आमची नजर छत्रपतींकडून 'छाव्या'कडे गेली. शिवाजी सावंतांनी 'संस्कृतमिश्रित मराठी' हा एक नवीन भाषाप्रकार वाचकांसमोर आणला.... 'मृत्युंजय' वाचल्यावर मात्र 'ययाती'पेक्षा कर्ण कितीतरी चांगला होता असं मनापासून वाटून जातं. असं असलं तरी काही ठिकाणी ऐतिहासिक तपशील अचूक, तर काही ठिकाणी ढोबळ अशी या पुस्तकांची गत झाली आहे....
(भाग - १)
> > > तुम्ही शिवाजीरावांची 'युगंधर' ही (कृष्ण)कादंबरी वाचलेली नसेल, असे गृहीत धरून तुमचे खास अभिनंदन करतो. ही कादंबरी न वाचणारा नक्कीच वाचणार!!! आणि जो (इच्छुक) वाचेल, तो कसा वाचणार?! कारण, ती हातातच धरवत नाही (खूपच जड! ठोकळा!! ). ती विद्वज्जड आहे की नाही, हे ज्याने ती पूर्ण वाचून खाली ठेवली असेल, त्यालाच विचारायला हवे...पण (हात भरून आल्यामुळे) ती खालीही ठेववत नाही, असे त्याने म्हटले नाही, म्हणजे मिळवली!
....................................
उर्वरित विनोदी लेखक नुसतेच ठणठणपाळ... (भाग -२)
> > > असं म्हणता? पण त्यातीलही एखाद-दुसरा 'जयवंत 'ऱ्यशवंत झालाच की!