भारतीय निर्वाचन आयोगाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या साठी काढलेल्या हस्तपुस्तिकेत "मतदानास नकार" या शीर्षकाखाली
निर्देश दिलेले आहेत. कोणत्याही मतदाराने मतदान करणार नाही असे सांगितल्यास त्या मतदाराची नोंद फॉर्म १७-अ मध्ये करून
मतदाराची स्वाक्षरी घ्यावयाची आहे. तसेच निवडणूक अधिकाऱ्याने "मतदान करण्यास नकार दिला" असा शेरा मारून आपली पूर्ण
स्वाक्षरी करावयाची आहे. आणि या शेऱ्यावर पुन्हा मतदाराची स्वाक्षरी घ्यायची आहे.
हँडबुक फॉर प्रिसायडिंग ऑफिसर्स या पुस्तिकेच्या ९३ व्या पानावर असे स्पष्ट म्हटले आहे. दुवा क्र. १
तेव्हा ज्यांना मतदान करायचे नाही त्यांनी तशी नोंद फॉर्म १७-अ मध्ये करून घ्यावी. ( हे एक जाड पुस्तकच असते, फॉर्म का म्हणतात देव जाणे ! )
अर्थात हे करण्यासाठी मतदान केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहावेच लागते ही गोष्ट निराळी.