------अप्रतिम वापरल्या आहेत प्रदीप!

मुक्त, अस्ताव्यस्त हे माझे जिणे,  तू छंद हो...

ये, सुखाला जन्मण्याआधी तुझे तू अंग दे...

---ऱ्हे तर झक्कासच!

शब्द मी आहे रिता, मज अर्थ तू देऊन जा...
एकदा कविताच माझी खास तू होऊन ये!

ह्या ओळी तर कालिदासाच्या, --

वागर्थाविव संपृक्तौ वागर्थःप्रतिपत्तये।
जगतः पितरौ वंदे पार्वतीपरमेश्वरौ॥

ह्याच्यातल्या कल्पनेजवळ जाताहेत.

सुन्दर------.
पण व्हायोलेट रंगात का बुवा लिहिली आहे? दिसतंय छान. पण बऱ्याच वेळा रंगीत कविता लिहिता.  काय औचित्य आहे?