उत्तम कविता - बोरकरांच्या 'स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा'च्या जातकुळीतली. आशयाचा आणि रचनेच्या वृत्ताचा विरोधाभासही लक्षणीय.

वारुणीची रात्र
स्तनाकार पेला
ऐसा आला गेला
जन्म माझा

- यावरून पुन्हा जपानी रमलाची रात्र आठवली. (करांतुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले...).

ऐशा आयुष्याचे
बांधोनी संचित
तथापि सस्मित
निघालो गा

- क्या बात है!