आल्या आल्या ती मला दिवसभरात काय काय घडलं ते सांगत रहायची.    "राधा गाभण होती ना तिला खोंड झाला आणि त्याच्या कपाळावर चांद आहे" किंवा "काल रात्री आम्ही केळफुलाची भाजी केली होती.   इतकी मस्त झाली होती. " असं काहीही.   कधी कधी ती आणि मी बांधावर फिरायला जायचो किंवा बांदेकराला कुकारे घालून बोलवायचो आणि त्याच्या होडीतून चक्कर मारून यायचो. कधी कधी खळ्यात पेळवेवर बसून मी चित्र काढायचो आणि माझ्याशेजारी ती ते बघत उभी रहायची.   शानू खूप नाजूक होती आणि गव्हाळ गोरी सुंदर.   माझं पूर्ण आयुष्य असंच चालू राहू शकलं असतं तर... लोक, परिसर, निसर्ग, हवामान सगळंच उत्तम... आणि शिवाय स्वच्छंदी जगणं... अजून काय हवं!

हे वर्णन खूप आवडले. कथा तशे सनसनाटी वगैरे नाही तरी गुंगवून ठेवते ही कमाल आहे.

चालूदे. वाचते आहे.