चित्त तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल आभार.
वाकणकर बद्दल अनेकांनी शंका विचारली आहे. वर कृष्णकुमारांच्या उत्तरात त्याचे स्पष्टीकरण आहे, ते बरोबर आहे.
आणखी,
रती आणि पुरी बद्दल काही शंका आल्या होत्या. त्यापैकी रती बद्दल अप्सराऐवजी देवपत्नी असा बदल केला. पुरी हे पीठ असले तरी अनेक ठिकाणी चारधाम म्हणून पुरीचा समावेश केलेला दिसला. शोधसूत्र म्हणून ते चालून जावे असे वाटले म्हणून बदल केला नाही.
सर्वांनी नेहमीप्रमाणे आपुलकीने सुधारणा सुचवल्याबद्दल सर्वांचे आभार. असाच लोभ असू दे.
-मेन.