अगदी मस्तच वर्णन केलंय.

"चढावरून जाताना गाडी अचानक थांबवावी लागली की माझा चेहेरा अजूनही ’तस्साच’ हवालदिल होतो. (कारण नंतर ती पुढे कमी, मागेच जास्त जाणार आहे हे फक्त मलाच ठाऊक असतं. ) "

याचा अनुभव मी घेतला आहे ठाण्याहून घोडबंदरमार्गे  बोरिवलीला जात असताना मध्ये एक चढ (डोंगर) पार करत  होतो तेव्हा माझ्या पुढे असलेली गाडी नेमकी एक बाई चालवत होत्या. त्या चढावर ट्रॅफिक असल्यामुळे गाडी थांबवून पुन्हा पुढे घ्यावी लागत होती, माझ्या पुढे असलेल्या बाई, पुढेजाण्याऐवजी दोन फूट मागेच यायच्या. तो चढ पार होईपर्यंत मलाच घाम फुटला होता.
या लेखामुळे तो प्रसंग आठवला.

खूपंच छान लेख .

अजय