मेघनाद देसाई या व्यक्तीचा (आदरार्थी बहुवचन वापरण्याची अजिबात इच्छा नाही; आणि तथाकथित 'लॉर्ड'शिप इंग्लंडच्या म्हातारीने दिली आहे, तिच्यासमोर मिरवावी, मी तिला ओळखत नाही) लेख मीही वाचला. माझेही डोके फिरले. मग शांतपणे विचार केल्यावर लक्षात आले, की तो लेख वाचण्याची चूक मी केली होती. मेघनाद देसाई, सुधींद्र कुलकर्णी, कुमार केतकर, शोभा डे, तवलीन सिंग, राजदीप सरदेसाई, तिस्ता सेटलवाड या आणि अशा मंडळींची बकबक वाचण्याची/ऐकण्याची चूक केल्यावर दुसरे काय पदरी येणार? माझा स्वतःचा वेळ मी स्वतःहून दवडला तर दोषी मीच!
हेच दक्षिण मुंबईतल्या गणंगांबद्दलही म्हणतो. 'पेज थ्री' हे आपणच उरावर घेतलेले ओझे आहे. बांद्रा-खार-जुहू-अंधेरी परिसरातही ही पिलावळ पसरली आहे. आपण जितके त्यांना (टीका करण्याकरता का होईना) मोजू, तितके ते शेफारतील.
अशा विष्ठेला स्पर्श न करणे हेच बरे.
टीप: किलोत्पाटी की कीलोत्पाटीव?