इंडियन एक्सप्रेसमध्ये आज आलेला शेखर गुप्ता यांचा लेख त्यातल्या त्यात बरा आहे. बाकी ह्या पिलावळीला ओरडू द्या. मागे राजदीप सरदेसाईच्या बायकोने (तिचे नावही घ्यावेसे वाटत नाही) आयबीएनमध्ये लिहिलेल्या लेखात असाच एक घाणेरडा दृष्टिकोण थुंकला होता. तिच्या मते मुंबईवर राज्य करणारे ग्रामीण महाराष्ट्राचे नेतृत्त्व हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. त्यांना नव्या युगाचा काही गंध नाही. मुंबईवर राज्य करण्यास ते पूर्ण नालायक आहेत. तिथे राजकारण्यांची गरज नसून सीईओ हवे आहेत. हे धोतर टोपी घालून साखर कारखाने चालवणारे लोक मुंबईला कसे काय सांभाळणार वगैरे वगैरे.
इंग्रजीतून लिहिणाऱ्या मराठी लेखकांबाबत शेलकी शेरेबाजी करणाऱ्या नेमाड्यांच्या झूल मधील उतारा देण्याचा मोह अगदीच आवरत नाहीः (जातीवाचक उल्लेख काढून टाकले आहेत)
तेव्हा बाळासाहेब जाधव म्हणाले, ही अवदसा तुमास कुठून सुचली मित्रहो? कोणी
गू खाल्ला तर आपणही गू खावा काय? पेपरात लिहून लिहून काय लिहिणार? हे
नंग्या हिजड्यांचे धंदे आपण करावे काय? तुमास माहीत नाही का कोणी श्रीमंत
माणूस हिजड्यांना दहा रुपये देऊन गल्लीतल्या कोणाकोणाविरूद्ध लावून देतो.
मग हिजडे कोणाचा काष्टा फेडतात, कोणाला घेरून गलिच्छ शिवीगाळ करतात. तसे
हे पेपरवाले हिजडे लावून दिलेले असतात आमच्याच लोकांनी. मुंबईतले हे सगळे
संपादक हिजड्यांसारखे भाड्याने लावून दिलेले आहेत आपल्या साहेबांनी! हे
तुमास ठाऊक नाही का. त्यापाशी ह्या दोन लाखांचा साखर कारखाना काढूया!
शेवटी जिल्ह्यात शिवशक्ती साखर कारखाना सुरू झाला.