आपण कोमल मृदू पासून अगदी कठोरही लिहिता. आपल्या प्रतिभेचा हा आवाका थक्क करणारा आहे.

विरोधकांनो शोधा कोलित, जाळपोळ विध्वंस करू
सर्व देश ओसाड होउ द्या तुम्हास मग अभिषेक करू

जे जे होइल ते ते पाहू सोशिक सारेजण 'सिंधू'
जबाबदारी झटकून टाकू बळीस बकरेही शोधू

ह्या ओळी लक्ष्यवेधी आहेत . 'सिंधू' चा उल्लेख हा एकच प्याल्यातल्या सिंधूचा आहे असे वाटते. नसेल तर कृपया खुलासा करावा.