चित्तमहाशय,
ज्यांनी आपल्यासाठी देह झिजवीले त्यांच्यासाठी किमान लेखणी तरी झिजवायला हवी ही इच्छा. यात मी विशेष काही केले नाही. ज्यांचे महान कृत्य आजतागायत फारसे ज्ञात नाही ते चार जणांना सांगावे आणि त्यांचे आपल्यावरचे ऋण अंशतः का होइना पण फेडण्याचा प्रयत्न करावा म्हणुन हा लेखन प्रपंच.
मला सलाम कशाला? यातले एक अक्षरही काझ्या बुद्धीचे नाही, सर्व माधुकरी मागून मिळवीलेले आहे. चित्रे सुद्धा अनेक पुस्तके व संकेतस्थळे यातून जमविलेली आहेत - भीक मागत्याला बारा घरे.
सलाम त्या महान आत्म्यांना जे आपल्या पराक्रमाच्या गाथा मागे न ठेवता निरपेक्ष बुद्धिने जे करायचे होते ते करून या भूमिवरून आपल्या ध्येयास्तव निघून गेले.
धन्यवाद