'च', 'ही' ही (आणि थोड्या कमी प्रमाणात 'सुद्धा', 'देखील', 'मात्र', 'पण', 'तर' असे काही) विकार/प्रत्यय/रूपे/अव्यये (जे काही म्हणत असतील ती) वाक्यात कुठेही येतात. शब्दाची लिंग/वचन/विभक्ती इत्यादींनी युक्त अशी रूपे झाल्यावर त्याला ही चिकटतात. (काही शैलींमध्ये ती विभक्तीप्रत्ययाआधीही चिकटवलेली पाहिलेली आहेत. )

शुद्धिचिकित्सकाची सुविधा घडवतेवेळी हे एक आव्हानच ठरले होते, त्याची आठवण झाली.