खरं म्हणजे मी काही सांगावं असा मी कोणी मोठा नाही. तरीही जे वाटलं ते सांगतो.

थोडेसे तुम्ही शैलीकडे अधिक लक्ष द्यावे असे मला वाटते. आणि शब्दयोजनासुद्धा कदाचित अजून सुधारता येईल. कवितेचा आशय पिन-पॉइंटेड (सूचिदर्शी ?) हवा.

एका वाक्यात सांगायचं तर लिहिल्यावर असं बघा की हे आपण नसतं लिहिलं तर चाललं असतं का ? जर नाही असं उत्तर असेल तर कविता जमली म्हणून समजा.