चर्चेचा विषय वाचला आणि हे दोन पदार्थ सुचले.

१. मक्याच्या कणसाची उसळ     २. भाकरीचे मुटगे( हा पदार्थ विजापूर, बेळगांव, धारवाड या भागात केला जातो. मी विजापूरचा.)

१.तीन चार कणसे ( किंचित जून असली तरी चालतील) किसून घ्या. एका भांड्यात किंवा पातेल्यात फोडणी करा त्यात हा कीस घाला. वरून तिखट, मीठ घाला आणि हलक्या हाताने हलवा. व्यवस्थित मिसळल्यावर गॅस बंद करा आणि थोडं गार झाल्यावर कोथिंबिर बारिक चिरून घाला. (तिखटाऐवजी फोडणीतच मिरच्या घातल्या तरी चालण्यासारखं आहे. )

(कणसे जून असली तरी चालतील कारण जर कोवळी कणसं जर घेतली तर शेवटी तिखट-मीठ टाकून हलवल्यावर कणीस कोवळं असल्यामुळं सगळा लगदा होऊन जातो आणि कदाचित मुलीला न आवडण्याची शक्यता!!)

२. या पदार्थासाठी तुम्हाला भाकरी मात्र कराव्या लागतील आणि त्या गरमगरम आणि बऱ्यापैकी पातळ असाव्या लागतील अन्यथा हा पदार्थ चांगला होणारच नाही.

गरम भाकरीवर तिखट, मीठ, लसणाची पेस्ट(४-५ पाकळ्या ठेचून) ह्या सर्वांचे मिश्रण हाताने पसरावे जेणेकरून मिश्रण भाकरीच्या वरच्या व थोडेफार खालच्याही भागाला लागावे. नंतर या भाकरीचा लाडू वळा आणि द्या खायला किंवा डब्यात.

                                                                             -----------------------कृष्णकुमार द. जोशी