+१

मी स्वतः गेल्या निवडणूकीत १७-अ भरला आहे.
काही सुचनाः
१. रांगेतून आपला नंबर आला की हातावर शाई लाऊन घ्यावी आणि मग मतदानास नकार द्यावा! जर आधी नकार दिलात तर नकार ग्राह्य धरला जात नाहि.

२. अश्यावेळी आळसामुळे तेथील कर्मचाऱ्यांकडून "जाऊ द्याना.. कुठलेही बटण दाबा ना काय फरक पडतो" आदी प्रकारचा दबाव येऊ शकतो. मात्र ठाम राहा

३. दिवसाच्या शेवटी नोंद झालेली नावे व मतदान केलेली नावे यांची संख्या टॅली व्हावी लागते. यासाठी मत नसल्यास १७-अ असणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेवटी तो फॉर्म (खरंतर रटाळ पुस्तिका) हातात पडतेच (थोडक्यात अधिकाऱ्याला ती द्यावीच लागते) ती भरावी. आणि आपला नकाराधिकार वापरावा!

-(व्हेटोचा वापरकर्ता) ऋषिकेश