सालासकट मुगाची डाळ आणि थोडी उडीद डाळ ६-७ तास भिजवून नंतर आलं-लसूण-मीठ-चिरलेला पालक घालून वाटायची. रंग चांगला हिरवा आला पाहिजे. (रंगासाठी कोथींबीरही घालू शकतेस.) रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी ढोकळा करायचा. (वाटल्यास थोडा सोडा घालायचा. ) वरून खोबरं, पुदिन्याची चटणी, फोडणी, शेव (यांपैकी काहीही किंवा सगळं) घालून खायला खूप छान लागतं शिवाय पौष्टिकही आहे.