आज कालच्या दिवसात तेही मुंबईत अजूनही तुमच्यासारखी आणि ऍनासारखी लोकं आहेत हे बघून, माणूसकीविषयी कृतज्ञ भाव उत्पन्न झाले.
असा काही लहान मोठा प्रसंग घडला की त्यातून समाजाची उदासीन मनोवृत्ती दिसून येते. आपल्या पुरते पाहण्याचा कातडी बचावूपण जिथे तिथे बोकाळलाय.. फक्त सरकत राहायचं कणाहीन प्राण्यांसारखं.. तो ही स्वतः हून सरपटतो आपण मागच्याच्या धक्क्यानं पुढे रेटले जातो.. दोन्ही डोळ्यांना झापडे बांधून.
तरी तिच अस दिसणं मला एक दिवस सार्थकी लागल्याच समाधान देऊन गेलं.. ते कायमसाठी!
लिखाणाची हातोटीही उत्कृष्टच. शेवट मोठा अर्थवाही. पु. ले. शु.!