आपले नेहेमीचे पोहे चाळून घ्यावेत. त्यात ओले खोबरे, कोबी व गाजराचा कीस, मोड आलेले मूग थोडेसे[कच्चेच], काकडीचा कीस, कोथिंबीर, पुदिना बारीक चिरून घालणे. थोडेसे डाळिंबाचे दाणे, अमेरिकन गोड मक्याचे दाणे आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिसळून घ्यावेत. झाले रंगीत आणि पौष्टिक पोहे तयार. हे पोहे चवीला छान लागतातच, पण मुले आवडीने खातात.

 एखादे वेळी यापैकी एखादा पदार्थ नसला तरी काही बिघडत नाही. रोज स्वयंपाक करताना या भाज्यांचा एखादा तुकडा/मूठभर मूग या पोह्यांसाठी आठवणीने राखून ठेवणे मात्र आवश्यक आहे.