प्रशिक्षण सर्वच क्षेत्राप्रमाणे नाटकातही महत्त्वाचे आहे. गाणे किंवा इतर काही कला शिकाव्याच लागतात पण नाटकाचे तसे नाही, आपण लहानपणपासून हौस म्हणून शाळेच्या नाटकात सहजपणे भाग घेउ शकतो. म्हणून कदाचित आपल्याला वाटते की प्रशिक्षण गरजेचे आहे की नाही. पण ते नक्कीच गरजेचे आहे.

दुसरा मुद्दा, माझ्या मते नाटकासाठी तरी विशिष्ट संस्थेतूनच शिक्षण घ्यावे लागते असे अजिबात नाही.एकांकिका स्पर्धातून पुढे आलेल्या लोकांचे त्या माध्यमातून प्रशिक्षण होतच असते. अर्थात स्पर्धाच करत राहणे हा काही मार्ग नव्हे. तुम्ही कोणाबरोबर नाटक करता आहात, हेही महत्त्वाचे आहे.

सारांश, प्रशिक्षण आवश्यकच. तुम्ही ते कसे घेता आहात हे जास्त महत्त्वाचे.

मी आजच मनोगत वर आलेलो आहे. तुमचा प्रश्न खूप दिवसांपूर्वीचा पण माझ्या जिव्हाळ्याचा असल्याने उत्तर देत आहे.