प्रतिसादांबद्दल मनः पूर्वक धन्यवाद... थोडक्यात गोडी असते हे सतत मनात ठेवून ही लेखमाला लिहिली. जितकं वाचलंय आणि जेवढं आठवलं त्यावरून लिहिलं. महाजालावर गद्य वाचायची मलाच अजून फारशी सवय झालेली नाही. त्यामुळे कंटाळा येण्यापूर्वी संपवण्याकडे कल होता. (दिलीप प्रभावळकरांनी 'महानगर' मध्ये 'कागदी बाण' जसे लिहिले होते तसंच काही प्रमाणात. ) काही वेळा लिहून नंतर काट-छाट केली. (उदा. व. पुं. च्या पुस्तकातून गडकऱ्यांच्या 'एकच प्याला'मध्ये सिंधूच्या तोंडी 'दारू' हा शब्द येत नाही.)
व्यासंग -
माझा व्यासंग (!? ) (कृपया वाचन म्हणूया) फार नाही हेही महत्त्वाचं कारण. पु. लं. चं गटण्याच्या त्या वाक्यानंतरचं वाक्य - '.. माझी मलाच शरम वाटली. त्यातल्या काही पुस्तकांची मी पानंही फाडली नव्हती' - हे मला लागू आहे. (वाक्य आठवणीनं लिहिलं आहे, चू. भू. द्या. घ्या. )
'व्यासंग वा संग' हे 'नरो वा कुंजरोवा'च्या चालीवर म्हणावंसं वाटतं. लिहिताना अनेक जणांशी झालेला संवाद आठवला. उदा. ग. वा. बेहेऱ्यांचं वाक्य मी माझ्या वडिलांकडून ऐकलं होतं.
पुढचं लेखन = ??? (मलाही माहिती नाही... आत्मचरित्र लिहावं म्हणतो...! इतिहासानंतर तो एक टप्पा गाठणं आवश्यक आहे.)
चित्त यांनी 'भोंदूबाबा' ह्या सानेकरांच्या लेखावद्दल केलेल्या खुलाशाबद्दल आणि सृष्टिलावण्या यांनी 'जगदंब' हे रूप बरोबर आहे हे सांगितल्याबद्दल त्यांचेही आभार.
पुनः धन्यवाद.
- कुमार