मी दहा दिवस उरळी कांचनला राहिले होते.  सकाळी सहा-सात योगासने  करायची. थोड्यावेळ हिरवळीवर फिरायचे. त्यानंतर दुधकाढा घेत पेपरवाचन.  अर्धा तास मालिश. मड थेरपी. दुर्वारस/इतर रस घेणे. कटी स्नान. बहुतेक लोकांना एनिमा घ्यावा लागतो मला घ्यावा लागला नाही. हे सगळं होईपर्यंत अकरा वाजतात. आपल्या खोलीत येऊन वाचन/लिखाण करायचे. मी आठ दिवस फलहारावरच होते. दाराशी असलेल्या फळं विकत घेऊन खाणे. झाडाखाली बसून तुझं वजन किती कमी झालं माझं किती, तू काय खाते अन मी काय खाते, गळल्यासारख वाटतं की नाही किंवा तुला काय झालं अश्या आरोग्यविषयक गप्पा मारणे. दुपारी तुमच्या दाराशी मिट्टी पट्टी ठेवलेली असते ती डोळ्यावर ठेवून निवांत पडून राहणे. अडीच वाजता परत योगासने व व्याख्यान/प्रवचन ऐकणे. संध्याकाळी तिथेच चालण्याचा व्यायाम. फलाहार त्यानंतर प्रार्थना  गप्पा मारत चंद्रस्नान घेणे. रात्री दूधकाढा घेऊन झोपणे.मी मे महिन्यात गेले होते तेव्हा भरपूर गर्दी होती त्यामुळे प्रत्येक ठिकाणी नंबर लावाला लागतो. मी निरोगी फक्त वजन थोडं जास्त होतं ते कमी करायला व एक वेगळा अनुभव घ्यायला गेले होते. वाचनालय उत्तम आहे त्यामुळे वेळ कसा जातो ते कळत नाही.