पाठ्यपुस्तकांमधून हेतूपुरःसर दडवून ठेवलेला हा गौरवशाली आणि स्फूर्तिप्रद इतिहास तुम्ही इथे देता आहात याबद्दल तुमचे आभार कितीमानावेत तेवढे थोडेच आहेत. मृणालिनी जोशींचे इन्किलाब , (बहुधा) वि. ग. जोशींचे मृत्युंजयांचा आत्मयज्ञ ही पुस्तके वाचताना
'मिट गया जब मिटानेवाला फिर सलाम आया तो क्या
दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या
किंवा
तंग आकर हम भी उनके जुल्मसे
चल दिये सुए अदम जिंदाने फैजाबाद से
वगिरे ओळी आणि त्यांच्यामागचा इतिहास वाचताना अंगावर काटा आला होता. 'रोजे को देखकर मेरे भी इष्क ने बलवा किया' वाचताना हसता हसता रडू आले होते.
तरीसुद्धा काकोरी कट ते आझादांचे आत्मार्पण या हिंसप्रसे च्या रोमहर्षक इतिहासाबद्दल जितके वाचावे तितके कमीच वाटते. ही खरोखर कुठल्यामुशीतून घडली होती आणि नक्की कोणत्या जन्माच्या पापांची फेड करण्यासाठी या कर्मदरिद्री देशात जन्माला आली होती देवच जाणे.

सर्वसाक्षीराव, तुम्ही या सर्व इतिहासावर आधारित एख पुस्तक लिहावे अशी तुम्हाला विनंती आहे. काही मदत लागली तर स्वयंसेवक म्हणून कामकरायला मी तयार आहे.
--अदिती