कविता चांगली आहे.

- मनापासून धन्यवाद.

पण एक सांगा, हे आवाहन कुणाला आहे? प्रियेला की प्रतिभेला?


-कविता लिहिताना समोर आठवणीतीलच कुणीतरी एक होती... :). प्रतिभेलाही हे वर्णन लागू होऊ शकेल; पण माझ्या नव्हे! कारण, मी जे काही लिहितो आणि मला जे काही सुचते, त्या लिहिण्याशी आणि सुचण्याशी प्रतिभा हा शब्द जोडता येणार नाही.
प्रतिभा हा शब्द फार म्हणजे फारच मोठा झाला. त्या शब्दाच्या आसपासही फिरकण्याची लायकी माझ्यासारख्या छोट्या कवीची नाही.

दोन्हीतून अर्थ लागतो म्हणून प्रश्न.

- या प्रश्नाचे उत्तर वरील उत्तरात आपल्याला मिळेल, अशी आशा आहे.

प्रतिसाद दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.