शुष्क.. निबर काळी..
बोथट खपली.. बघितली आहेस कधी?
ती ज्वालामुखी नंतरच्या मुरमाड जमिनी सारखीच दिसते..
राठ! जखमेचा रसरसता लाल रंग लपवणारी..
जागच्या जागी गोठलेली..

शब्दांची आणि प्रतिमांची योजना फार आवडली. कविता आवडली हे वेगळे सांगायला नको. हर्षल म्हणतात त्याप्रमाणे तिथे प्रस्तर हवे का?