चंद्रमुखी नाहीस तशी तू...
तुझा चेहरा जरा गोलसर
म्हणावेत हे कसे गुलाबी?
ओठ कुसुंबी तुझे, ओलसर!
क्या बात है प्रदीपराव. कविता फार आवडली. पहिल्या कडव्यालाच खल्लास झालो.
गडद तपकिरी या डोळ्यांना
जुन्या मधाचा रंग जरासा...
तुषार कोमल कधी स्मितांचे
हसू कधी हे गूढ झरासा...!
सुरेख!!!
काय हवे ते, तुझे तुलाही
कळले नाही कधी नेमके
शोधत बसलो उगाच मीही
विचारायला शब्द शेलके!
वा वा वा.
झिळमिळ झिळमिळ इथे राहिली!
अप्रतिम... फार सुरेख ओळी.