हा माझा बालबृहस्पतिच चिऊ-काऊचे बोबडे बोल ’ऑप्शन’ला टाकून, ’चिमणी का असते? ’ असा प्रश्न विचारून एकदम तत्त्वज्ञानाच्या तासाला का बरं बसला? मला काही उमगेचना. त्याच्या चेहेऱ्यावर ’चिंता करितो विश्वाची’ असं उत्तर देणाऱ्या बाल रामदासस्वामींची काही झलक दिसतीये का ते मी पहायला लागले.

स्फुट फारफार आवडले. शेवटचा परिच्छेद नसता तरी चालून गेले असते. अर्थात वाचकांना अशाप्रकारचे 'अपेक्षित' कलाटणी देणारे शेवटचे परिच्छेद फार हवे असतात, फार आवडतात हेही खरेच.