माझी भाची आता १० वर्षांची आहे. तिला जेव्हा ठीक-ठाक बोलता येऊ लागलं तेव्हा तिला कोणतीही नवीन वस्तू दिसली की ती विचारायची - "हे काय आहे? ". हे विचारतानाचा तिचा टोन छान मजेशीर असायचा. नंतर नंतर आम्हाला त्याची एवढी सवय झाली होती की कधी तिने हा प्रश्न नाही विचारला तर आम्हीच तिला सांगायचो "हे काय आहे? " म्हण ना म्हणून.
वर जालसर्वज्ञ यांनी म्हटल्याप्रमाणे हे ती फक्त करमणूक म्हणून विचारत असेल असं मला नाही वाटत. किंबहुना कोणतीच लहान मुलं जे निरागस प्रश्न विचारतात ते केवळ कुतूहल म्हणूनच असतं असं मला वाटतं. अर्थात काही मुलं थोडी मोठी झाल्यावर कदाचित करमणूक म्हणून असे प्रश्न विचारत असतीलही...

असो. लेखन खुप खुप आवडलं.
-योगेश