हा लेख अतिशय माहितीपूर्ण आहे आणि तरीही त्याची रंजकता (येथे रंजकता याचा अर्थ केवळ करमणूक असा न घेता, कंटाळा न आणण्याचा गुण असा घ्यावा. ... अधिक अनुरूप शब्द मिळाल्यास सुचवावा. ) जराही कमी वाटत नाही. शिवाय भाषाही सोपी आहे.
त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि धन्यवाद.
नेहमी असे समाजोपयोगी डोळे उघडणारे लेख एकतर बोजड तरी असतात नाहीतर अतिशय निरस असतात. शिवाय सतत भडिमार झाल्याने काही काळाने नकोसे व्हायला लागतात. तसे तुमच्या लेखनाच्या बाबतीत होणार नाही ह्याची खात्री तुमच्या प्रवाही आणि सुबोध लिहिण्याच्या पद्धतीमुळे वाटत आहे.
पुढील लेखांक वाचायला उत्सुक आहे.