विद्यापीठाकडून यासंबंधात पुढील अपेक्षा आहेत.
अ)पत्रकारितेच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा तात्काळ स्वीकार.
आ) मराठी पत्रकारितेशी संबंधित मंडळींचा समावेश असलेलं स्वतंत्र अभ्यासमंडळ.
इ) सध्या जिथे शिक्षणाचे माध्यम म्हणून इंग्रजी उपलब्ध आहे तिथे मराठी पत्रकारिता, मराठी भाषा, महाराष्ट्राचा सामाजिक राजकीय, आर्थिक सांस्कृतिक इतिहास इ. चा समावेश असलेल्या अभ्यासपत्रिका अनिवार्यपणे अंतर्भूत कराव्यात.
ई) पत्रकारिताविषयक अभिजात व समकालीन महत्त्वाच्या ग्रंथांच्या मराठी अनुवादासाठी कालबद्ध योजना आखून शिष्यवृत्त्या देण्यात याव्यात.
उ) जून २००९ पासून या बदलांची अंमलबजावणी करण्यात यावी.
पत्रकार व पत्रकार संघटनांकडून अपेक्षा
अ) पत्रकारिता शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीच्या स्वीकारासाठी सर्व व्यासपीठांवरून आग्रह धरावा. त्यांची व्यावहारिक व व्यावसायिक उपयुक्तता मराठी पत्रकारच पटवून देऊ शकतात.
आ) या दृष्टीने पत्रकारिता प्रशिक्षणात प्रत्यक्ष सहभागी होऊन आपला वेळ देण्याची तयारी दाखवली पाहिजे.
इ) शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा स्वीकार झाल्यावर मोठ्या प्रमाणात संदर्भसाहित्याची निर्मिती व अनुवाद करावा लागेल. त्यासाठीची काही जबाबदारी विद्यापीठ उचलू शकेल पण ते पुरेसे ठरणार नाही. त्यासाठी पत्रकार संघटनांनी सक्रिय सहभाग देण्याची गरज आहे.