नाही.
रूबाई हा पुन्हा वेगळाच प्रकार आहे... त्यातही चारच ओळीच असतात. (यमक / अंत्ययमकांची पद्धत मुक्तकासारखीच असते); पण रुबाईची वृते वेगळी आहेत. ती चोवीस आहेत. त्या वृत्तांमध्येच रुबाई लिहिली जाते.
इथे मला कविवर्य सुऱेश भट यांची एक अतिशय सुंदर (अप्रकाशित) रुबाई आठवते. ती अशी -
केव्हाच तुला थांब म्हणालो नाही!
केव्हाच तुला शोधत आलो नाही!
ओठांत तुझ्या उत्तर माझे होते...
मी मात्र कधी प्रश्नच झालो नाही!