मानवाची प्रगती झाली हेच मुळात पूर्णसत्य नाही. आग (उर्जा) आणि चाक (वाहन) हे दोन आदिम शोध वगळता इतर प्रगतीच्या खुणा, साधनं पंचाहत्तर - ऐंशी टक्के मानवांपासून दूरच आहेत. (त्यांच्या नियमित वापरात नाहीत). माणसांतल्या काहींनी स्वतःच्या गरजांची अधिक उत्तम पूर्तता करण्यासाठी आणि स्पर्धेला दूर ठेवण्यासाठी किंवा तीत जिंकण्यासाठी स्वतःच्या (किंवा इतरांच्या) मेंदूतून निघालेल्या काही पद्धती वापरल्या, त्या अनेक दृष्टीने युनिक आहेत, हे खरे. पण अशा गोष्टींसाठी अद्वितीय पद्धती निसर्गात अनेक प्राण्यांनी वेळोवेळी वापरल्यात.

गृहितकांवर थांबावे लागते कारण आपण स्वीकारलेल्या कुठल्याही मार्गाना त्यांच्या मर्यादा असतात, मग ते विज्ञान असो की अध्यात्म. या मार्गाच्या चौकटी आपणच घालून घेतो, मग त्यापलिकडचे कळण्यासाठी गृहितकांवर थांबणे ओघानेच येते.

उत्तरासाठी उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.