अगदी मनाच वेध घेणारी कविता

आठवतात ते दिवस...
निखळ खळखळून हसण्याचे
कशाचीही पर्वा न करता,
मनात येईल ते बोलण्याचे
उगाच व्यर्थ चर्चांचे
आणि लुटुपुटूच्या भांडणांचे
मनापासून अनुभवलेल्या,
निर्भेळ आनंदाचे...

खरेच. नेहमी अशा जुन्या आठवणी मनाला चुटपुट लावून जातात.

स्वार्थाच्या बाजारात
किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो
सोडून स्वार्था तो जातो

हे बालकवींचे बोल आठवतात.

येतील का ते कधी परत...

नक्की येतील. खरे तर ते गेलेले नसतात. आपणच बालकवींसारखे आपल्या  मनावर परिणाम करून दुःखी होतो. आपण आपल्याला हवे तसे आनंदाने लिहीत राहावे, हेच आनंदाचे इंगित आहे.

-श्री. सर. (दोन्ही)